Site icon सक्रिय न्यूज

बस दुचाकी अपघातात पुन्हा एकाचा मृत्यू…..!

बस दुचाकी अपघातात पुन्हा एकाचा मृत्यू…..!

अंबाजोगाई दि.१८ – केज अंबाजोगाई रोडवर मागच्या चार दिवसांपूर्वी बस दुचाकीचा अपघात होऊन त्यात एकाचा जागीच मृत्यू झाला होता.तर त्याच दिवशी धारूर तेलगाव रोडवर बस दुचाकीचा अपघात झाला आणि त्यात गावंदरा येथील पोलीस पाटलाला जीव गमवावा लागला. आणि पुन्हा लोखंडी सावरगाव जवळ बसने दुचाकीला समोरासमोर दिलेल्या धडकेत दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला तर दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. हा अपघात बुधवारी (दि. १८) दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास झाला. संजय अंकुश डहाणे (वय ५०, रा. कोदरी, ता. अंबाजोगाई) असे अपघातातील मृत व्यक्तीचे नाव आहे.

कोदरी येथील संजय डहाणे, रवींद्र दगडू जाधव (वय ५३) आणि बालासाहेब शेषेराव कदम (वय ४७) हे तिघेजण अंबाजोगाईहून दुपारी गावाकडे दुचाकीवरून (एमएच ४४ एन ४३५२) निघाले होते. ते लोखंडी सावरगावच्या पेट्रोल पंपाच्या पुढे आले असता समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या औरंगाबाद – अंबाजोगाई एसटी बसने (एमएच २० बीएल ०५१४) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील तिघेही गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात दाखल केले असता तिथे उपचार सुरु असताना संजय डहाणे यांचा मृत्यू झाला. तर, उर्वरित दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी लातूरला हलवण्यात आले आहे.

शेअर करा
Exit mobile version