केज दि.20 – केज तहसील कार्यालयातील, संजय गांधी निराधार योजनेच्या नायब तहसीलदार आशा वाघ ह्या शुक्रवारी दुपारी जेवण करून तहसील कार्यालयाकडे आपल्या स्कुटीवरून येत आसताना चार चाकी वाहनातून आलेल्या एका महिलेसह इतर 4 अज्ञात आरोपीनी त्यांच्या अंगावर पेट्रोल टाकून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला.या हल्ल्यातून त्या बालंबाल बचावल्या असून सध्या त्यांच्यावर केज येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार चालू आहेत.
दरम्यान मागच्या कांही महिन्यांपूर्वी तहसिल कार्यालयातच त्यांच्यावर कोयत्याने हल्ला झाला होता त्यातून त्या सुदैवाने वाचल्या होत्या, आणि पुन्हा हा हल्ला झाल्याने खळबळ माजली आहे.