Site icon सक्रिय न्यूज

एक नव्हे…दोन नव्हे तर तब्बल २२ कोब्रा सापाची पिल्ले जन्मली घरात…..!

युसूफवडगाव दि.२२ (सचिन उजगरे) साप किंवा नाग हा शब्द जरी ऐकला तरी कित्येकांच्या आंगावर काटा उभा राहतो.अन दिसला तर बोबडीच वळते. मात्र केज तालुक्यातील युसूफवडगाव येथील आकाश वैरागे आणि अक्षय वैरागे या दोन सर्पमित्रांनी नुकतेच कृत्रिम पद्धतीने आंडे उबवुन क्रोबा जातीच्या २२ पिल्लांना घरात जिवदान दिले असुन त्यांना नैसर्गिक वातावरणात सोडुन देण्यात आले आहे.
सर्पमित्र आकाश वैरागे व अक्षय वैरागे यांना धनेगाव येथुन घरात साप असल्याचा काॅल आल्यावर ते तात्काळ त्या ठिकाणी गेले.परंतु तोवर तो साप निघुन गेला होता. त्यांनी घराच्या आजुबाजुला त्या सापाचा शोध घेण्यास सुरुवात केली पण त्यांना साप काही आढळुन आला नाही. मात्र त्यांंना त्या ठिकाणी एका बिळात क्रोबा जातीच्या नागाची तब्बल २२ आंडे आढळुन आली. त्यांनी ती अंडी सुरक्षित बाहेर काढुन ती घरी आणली आणि घरी आणुन मग त्यांनी त्या आंड्यांमधुन पिल्लांना बाहेर पडण्यासाठी कृत्रिम पद्धतीने उब दिली असता ३/४ दिवसापुर्वी त्या आंड्यांमधुन क्रोबा जातीच्या तब्बल २२ पिल्लांनी जन्म घेतला. सर्पमित्रांनी घेतलेल्या काळजीमुळे या आंड्याना कुठलीही इजा झाली नाही हे विशेष. २२ पिल्लांना निसर्गाच्या सान्निध्यात सोडण्यात आले. साप हा अन्न साखळीचा घटक असुन शेतकऱ्यांचा खरा मित्र आहे म्हणुन त्याला न मारण्याचे आव्हान या सर्पमित्रांनी केले असून जर कुठे साप आढळून आला तर या (८८८८७८४६८८) नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन केले.

शेअर करा
Exit mobile version