Site icon सक्रिय न्यूज

प्रा.किरण पाटील यांच्या प्रचारार्थ अंबाजोगाई येथे भव्य मेळावा संपन्न……!

प्रा.किरण पाटील यांच्या प्रचारार्थ अंबाजोगाई येथे भव्य मेळावा संपन्न……!
अंबाजोगाई दि.२१ – मराठवाडा शिक्षक मतदार संघाचे भाजपा व शिक्षक परिषदेचे अधिकृत उमेदवार प्रा. किरण पाटील यांच्या प्रचारार्थ अंबाजोगाई येथे दि.२० रोजी भव्य शिक्षक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, माजीमंत्री पंकजा मुंडे, खासदार डॉ.प्रितम मुंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
               यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी बोलताना पंकजा मुंडे यांनी प्रचारात ऊर्जा आणली असल्याचे सांगितले.तर स्व.गोपीनाथ मुंडे यांचे माझ्यावर अनंत उपकार आहेत. किरण पाटील यांना आपल्या मताचे कर्ज द्या ते कर्ज फेडतील असा विश्वास दिला.मी स्वतः, पंकजा मुंडे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असे चौघे आम्ही त्यांचे जामीनदार असल्याचे सांगितले. या निवडणुकीत
सक्षम पर्याय आपण उभा केला आहे.
पाटील यांच्याबद्दल सर्वांना आनंद आहे.
फॉर्म भरला त्या दिवशीच खरी रंगत आली असेही सांगितले.किरण पाटील यांनी आमदार नसताना आणि आपले सरकार नसताना शिक्षकांच्या प्रश्नावर संघर्ष केला. 1160 कोटी या सरकारने दिले. पंकजा यांनी विना शब्द काढून 20 टक्क्यांचा प्रस्ताव मांडला. जुन्या पेन्शन संदर्भात मी आणि पंकजा सरकरला बैठक घ्यायला लावू.आम्ही तुमचा मुद्दा प्रकर्षाने मांडू. महाविकास आघाडीचे तुकडे तुकडे झाले आहेत.
किरण पाटील यांना प्रचंड जनसमर्थन मिळत आहे. राष्ट्रवादी मध्ये उभी फूट आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांना बीडमध्ये येण्याचा अधिकार नाही. वैधानिक विकास मंडळाला मुदतवाढ देण्यासाठी अजित पवार यांनी अगोदर बारा आमदार करा म्हणून विरोध केला. मात्र या सरकारने मुदतवाढ दिली. काँग्रेस राष्ट्रवादी सरकार आले की मराठवाडा मागे पडला. तुमचे प्रश्न सोडवण्याची जबाबदारी किरण पाटील यांच्यावर द्या. किरण पाटील यांच्यात तुमचे प्रश्न सोडवण्याची धमक आहे असे ठामपणे सांगितले.
           तर पंकजा मुंडे यांनी बोलताना सांगितले की, शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आमदार असतो. शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्यांचा निर्णय आम्ही घेतला. शिक्षकांचे अवांतर कामे कमी झाली पाहिजेत. उमेदवारी साठी पाटील यांनी आम्हाला निवडले. माझी भेट घेण्यासाठी किरण पाटील उज्जैनला आले. आजच्या दिवशी निर्णय घ्या, प्रश्न मार्गी लावण्यासाठी किरण पाटील लढतील. सत्तेच्या विरुद्ध प्रवाहात जाण्यात अर्थ नसतो.त्यामुळे मोठ्या मताधिक्याने किरण पाटील यांना विजयी करा, उमेदवारावर विश्वास दाखवा. किरण पाटील आशेचा किरण घेऊन येतील असा विश्वास व्यक्त केला.
          खासदार डॉ. प्रितम मुंडे यांनी किरण पाटील यांना मेरिटमध्ये निवडून आणण्याचे आवाहन केले.तर उमेदवार प्रा.किरण पाटील यांनी स्व.गोपीनाथ मुंडे यांचे स्मरण करून मनोगत व्यक्त केले. पंकजा मुंडे यांच्या शिफारशीवरून मला उमेदवारी मिळाल्याचे सांगत शिक्षकांच्या सर्व प्रश्नांची मला जाण असून मी विधानपरिषदेत आपले प्रश्न प्रकर्षाने मांडण्याचे व ते सोडवून घेण्याचे वचन दिले. जुन्या पेन्शन बाबत किरण पाटील यांनी सकारात्मक निर्णय घेण्याची विनंती करत प्रथम पसंतीचे मत देऊन विजयी करण्याचे आवाहन केले.
           यावेळी व्यासपीठावर आ.लक्ष्मण पवार, नंदकिशोर मुंदडा, रमेश आडसकर,राजेंद्र मस्के, अक्षय मुंदडा, बिपीन मंगरुळे, अच्युत गंगणे, रमाकांत मुंडे, सुनील गलांडे, उषाताई मुंडे, विजयकांत मुंडे, विष्णू घुले,सुनील घोळवे, राहुल गदळे यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती.प्रास्ताविक अक्षय मुंदडा यांनी तर सूत्रसंचलन भाजपचे प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी केले. सदरील मेळाव्याला अंबाजोगाई, केज, धारूर, परळी, माजलगाव, वडवणी तालुक्यातील हजारो शिक्षकांची उपस्थिती होती.
शेअर करा
Exit mobile version