मुंबई दि.२२ – जुन्या पेन्शन योजनेबाबत आमचे सरकार सकारात्मक असल्याचे वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. त्यामुळं सरकारी कर्मचारी आणि शिक्षकांच्या बाबतीत लवकरच राज्य सरकार चांगला निर्णय घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सरकारी कर्मचारी आणि शिक्षकांच्या बाबतीत लवकरच राज्य सरकार चांगला निर्णय घेण्याची शक्यता आहे. जुन्या पेन्शनविषयी राज्य सरकार सकारात्मक असल्याची माहिती मिळत आहे. शिक्षक आणि सरकारी कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेन्शन योजनेबाबत आमचे सरकार सकारात्मक असल्याचे वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. महाराष्ट्राचा शिक्षण विभाग जुनी पेन्शन योजनेचा (OPS) अभ्यास करत असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर सरकारी कर्मचारी आणि शिक्षकांना लवकरच चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. जुन्या पेन्शनसाठी राज्य सरकारचे कर्मचारी संप करण्याच्या तयारीत आहेत. राज्य सरकारी कर्मचारी निवृत्ती वेतनाबाबत आक्रमक झाले आहेत. जुनी पेन्शन योजना लागू केली नाही तर, मार्चमध्ये संपावर जाण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे. त्यानंतर राज्य सरकारने सकारात्मक दृष्टीकोन दाखवला आहे.