Site icon सक्रिय न्यूज

बीड जिल्ह्यातील 52 बोगस दिव्यांग शिक्षक निलंबित…..!

बीड जिल्ह्यातील 52 बोगस दिव्यांग शिक्षक निलंबित…..!

बीड दि.23  – स्वतःसह कुटुंबातील सदस्य कर्णबधीर, अल्पदृष्टी, अस्थिव्यंग यासह गंभीर आजारी असल्याचे प्रमाणपत्र दाखल करून बदलीसाठी अनेक शिक्षकांनी प्रयत्न केला होता, दाखल केलेले प्रमाणपत्र हे बोगस असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांच्या निदर्शनास आल्यानंतर संशयित शिक्षकांची स्वरातीमध्ये पुनर्रतपासणी करण्यात आली. यामध्ये तब्बल 52 शिक्षक हे बोगस आढळून आले होते. त्यानंतर या शिक्षकांची सुनावणी घेऊन सोमवारी (दि.23) तडकाफडकी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
बीड जिल्हा परीषदेतील सन २०२२ प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाइन प्रणालीद्वारे जिल्ह्यांतर्गत बदली संदर्भात संशयास्पद दिव्यांग प्रमाणपत्र जोडल्याचा संशय व तक्रारीनंतर मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांनी ३३६ शिक्षकांची सुनावणी घेतली. त्यापैकी २३६ शिक्षकांची अंबाजोगाई येथील स्वरातीत रूग्णालयात पुनर्रतपासणी करण्यात आली. यामध्ये तब्बल ५२ दिव्यांग शिक्षक बोगस आढळून आले. सोमवारी त्यांच्यावर तडकाफडकी निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

निलंबित केलेल्या 52 दिव्यांग बोगस शिक्षकांची विभागीय चौकशी प्रस्तिवत करण्यात आली आहे. या चौकशीनंतर या शिक्षकांवर बडतर्फची कारवाई होऊ शकते.अंबाजोगाईतील स्वाराती रुग्णालयात पुनर्रतपासणीसाठी पाठवलेल्या 336 पैकी 248 शिक्षकांचा अहवाल प्राप्त झालेला आहे. त्यात 52 बोगस दिव्यांग शिक्षक आढळून आले. उर्वरित ८८ दिव्यांग शिक्षकांचा अहवाल येणे बाकी असून यामध्ये किती बोगस आढळतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

निलंबित शिक्षक
१) धनंजय गोविंदराव फड अंबाजोगाई अल्पदृष्टी, २) रविकांत सुधाकर खेपकर अंबाजोगाई अस्थिव्यंग, ३) अशोक वामनराव यादव अंबाजोगाई अस्थिव्यंग, ४) चिंतामण तुकाराम मुंडे अंबाजोगाई अस्थिव्यंग, ५) राजू शंकर काळे आष्टी (मुलगी दिशा राजू काळे कर्णबधीर), ६) वर्षा रामकिसन पोकळे आष्टी कर्णबधीर, ७) राजेंद्र शिवाजी हजारे आष्टी (पत्नी धोंडे सुषमा लक्ष्मण कर्णबधीर, ८) अमोल कुंडलीक शिंदे आष्टी अल्पदृष्टी ९) आनंद सिताराम थोरवे आष्टी अस्थिव्यंग, १०) मनिषा उत्तमराव धोंडे आष्टी (पती हुमे रविंद्र उत्तमराव अस्थिव्यंग), ११) देविदास भानुदास नागरगोजे केज अल्पदृष्टी, १२) आसाराम पांडुरंग चेंडुळे गेवराई अल्पदृष्टी १३) रमेश ज्ञानोबा गाढे गेवराई अल्पदृष्टी, १४) हनुमान यशवंत सरवदे गेवराई अल्पदृष्टी १५) सुधाकर दगडू राऊत गेवराई अस्थिव्यंग, १६) अरूण भीमराव चौधरी गेवराई अस्थिव्यंग, १७) महादेव सखाराम जाधव गेवराई अस्थिव्यंग, १८) मनोजकुमार अशोकराव जोशी गेवराई अस्थिव्यंग, १९) मनोजकुमार मधुकर सावंत गेवराई अस्थिव्यंग, २०) अनिता गोविंदराव यादव गेवराई (पती सावंत मनोजकुमार मधुकर अस्थिव्यंग), २१) अर्चना भगवान इंगळे धारूर अस्थिव्यंग, २२ ) शांताराम भानुदासराव केंद्रे परळी अल्पदृष्टी, २३) मनोज नरसिंगराव सुर्यवंशी परळी अल्पदृष्टी, २४) दिपक भालचंद शेप परळी अल्पदृष्टी, २५) ज्ञानदेव नवनाथ मुटकूळे पाटोदा अल्पदृष्टी, २६) गणेश भागवत ढाकणे पाटोदा अल्पदृष्टी, २७) पांडुरंग आबासाहेब गवते बीड कर्णबधीर, २८) शितल शहादेव नागरगोजे बीड कर्णबधीर, २९) स्वाती चंद्रसेन शिंदे बीड कर्णबधीर, ३०) भारती मुरलीधर गुजर बीड कर्णबधीर, ३१) आंबिका बळीराम बागडे बीड कर्णबधीर, ३२) विमल नामदेव ढगे बीड कर्णबधीर, ३३) जीवन रावसाहेब बागलाने बीड कर्णबधीर, ३४) शोभा आंबादास काकडे बीड कर्णबधीर, ३५ ) वनमाला देविदासराव इप्पर बीड कर्णबधीर, ३६) आश्रुबा विश्वनाथ भोसले बीड अल्पदृष्टी, ३७) राजश्री रघुवीर गावंडे बीड अल्पदृष्टी, ३८) वाजेदा तबस्सुम मोहमद शफीउद्दीन बीड अल्पदृष्टी, ३९) शैला नागनाथ शिंदे बीड (मुलगा काटे हर्षवर्धन सतिष अल्पदृष्टी), ४०) रतन आंबादास बहीर बीड (पत्नी हातवटे अश्विनी विठ्ठलराव अल्पदृष्टी), ४१) दत्तू लक्ष्मण वारे बीड अस्थिव्यंग, ४२) बंडू किसनराव काळे बीड अस्थिव्यंग, ४३) चांदपाशा महेबूब शेख बीड (पत्नी आयेशा सिध्दीका इनामदार अस्थिव्यंग ) ४४) उज्वल्ला अशोक जटाळ (पती भोसले नितीन शत्रुघ्न अस्थिव्यंग ) ४५) आयशा सिद्दीक इनामदार बीड अस्थिव्यंग, ४६ ) ज्योती लहुराव मुळूक बीड अस्थिव्यंग, ४७ ) अंजली प्रभाकर भोसले बीड (पती काळे बंडू किसनराव अस्थिव्यंग, ४८) गोविंद अशोक वायकर बीड अस्थिव्यंग, ४९) शेख समीना बेगम शेख हमीद बीड (मुलगा दाणी रियाज शेख अस्थिव्यंग ), ५० ) सुनीता भारत स्वामी बीड (मुलगी स्वामी प्रतिक्षा भारत अल्पदृष्टी), ५१) निवृत्ती रामकिशन बेदरे शिरूर (मुलगा बेदरे चंद्रकांत निवृत्ती अल्पदृष्टी) ५२)बाळू उमाजी सुरासे शिरूर अल्पदृष्टी या शिक्षकांचा बोगस शिक्षक यादीत समावेश आहे.

शेअर करा
Exit mobile version