दहावी आणि बारावी परीक्षेबाबत महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून महत्वाच्या सूचना जारी करण्यात आल्या आहेत. यावर्षी होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी अत्यंत कडक नियम करण्यात आले आहेत.
बोर्डाच्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांची चोरी करणे, प्रश्नपत्रिका मिळविणे, विकणे आणि घेणे, मोबाईल किंवा अन्य इलेक्ट्रॉनिक्स माध्यमावर प्रसारित केल्यास अशा परीक्षार्थी विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच अशा विद्यार्थ्यास पुढील 5 परीक्षांना प्रतिबंध करण्यात येणार आहे. याशिवाय त्या परीक्षार्थीवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.