Site icon सक्रिय न्यूज

हरभरा पीकाचा ढीग जळून खाक……! 

हरभरा पीकाचा ढीग जळून खाक……! 
केज दि.6 –   एका शेतकऱ्याने पावणे दोन एकरमधील हरभरा पीक काढून त्याचा ढीग घालून ठेवलेला होता. हा ढीग अज्ञात कारणाने लागलेल्या आगीत जळून खाक झाल्याने साबला ता.केज येथील शेतकऱ्याचे २५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
      साबला ( ता. केज ) येथील सुदाम किशन काकडे या शेतकऱ्याची शेत सर्वे नं. १७७ मध्ये जमीन असून या पावणे दोन एकर जमिनीमधील हरभरा पीक काढून त्यांनी काढलेल्या हरभरा पिकाचा ढीग घालून ठेवलेला होता. ३ फेब्रुवारी रोजी अज्ञात कारणाने या ढिगास आग लागली. या आगीत संपूर्ण ढीग जळून त्याची राख झाली. या दुर्घटनेत सुदाम काकडे या शेतकऱ्याचे २५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. काकडे यांच्या खबरेवरून अकस्मात जळीतची केज पोलिसात नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस नाईक दिलीप गित्ते हे करताहेत.
शेअर करा
Exit mobile version