Site icon सक्रिय न्यूज

बालकांच्या कलाविष्काराने प्रेक्षकांचे मनोरंजन……!

बालकांच्या कलाविष्काराने प्रेक्षकांचे मनोरंजन……!

केज दि.८ – विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी शाळा महाविद्यालयामध्ये वार्षिक स्नेहसंमेलन तसेच इतर उपक्रमाचे आयोजन केल्या जाते. आणि त्याच अनुषंगाने केज येथील चाटे स्कूलमध्ये ही वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये चिमुकल्यांच्या कलाविष्काराने प्रेक्षकांनी मनमुराद आनंद घेतला.

          शहरातील समर्थ नगर भागामध्ये असलेल्या चाटे स्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. सदरील कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर मुंदडा तर प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्ष सीता बनसोड, हनुमंत भोसले, पत्रकार डी.डी. बनसोडे, सरपंच दिपाली चाटे, रामदास तपसे, हनुमंत सौदागर, संतोष गालफाडे, माजेद शेख, गौतम बचुटे, कविता कराड,दुर्गदास लांब यांच्यासह महादेव सूर्यवंशी, बाळासाहेब गाढवे यांची प्रमुख उपस्थिती होती.                                             कार्यक्रमाच्या सुरुवातीला चाटे स्कूलचे संचालक प्राध्यापक शिवाजी चाटे यांनी कार्यक्रमाचे प्रस्तावित केले. यामध्ये त्यांनी शैक्षणिक क्षेत्रामध्ये पालकांनी जो विश्वास टाकला आहे त्या विश्वासाला कधीही तडा जाऊ दिला जाणार नाही असा शब्द दिला. तर सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर मुंदडा यांनी अशा कार्यक्रमामधून विद्यार्थ्यांमध्ये एक प्रकारचे धाडस निर्माण होते. तसेच आपले कलागुण सादर करण्यासाठी विद्यार्थ्यांना संधी मिळते आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो असे मत व्यक्त केले. सदरील स्नेहसंमेलनामध्ये लहान लहान बालकांनी ”गणपती गीत”, ”तुला फिरविण माझ्या गाडीवर”, ”मला म्हणत्यात हो म्हणत्यात पुण्याची मैना”, ”काठी न घोंगडं घेऊ द्या की रं” इत्यादी गीतांवर अतिशय मनमोहक नृत्य सादर करून प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले.                     सदरील कार्यक्रमासाठी बालकांच्या पालकांसह शहरातील नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चाटे स्कूलच्या सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
शेअर करा
Exit mobile version