केज दि.9 – राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभर विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.त्याच अनुषंगाने केज येथेही उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिक्षक डॉ.संजय राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
वैद्यकीय अधीक्षक डॉ संजय राऊत हे नेहमीच सामाजीक कार्यक्रमाचे आयोजन करीत असतात. मोफत रक्त तपासणी, नेत्र तपासणी, मधुमेह, रक्तदाब अशा विविध शिबीराचे आयोजन सातत्याने करून गरजू रुग्णांना दिलासा दिला जातो. राज्यात नेहमीच रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने रक्तदात्यांनी पुढे येऊन रक्तदान करण्याची गरज आहे.आणि त्यांना प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने उपजिल्हा रुग्णालयाच्या वतिने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुवारी (९ फ्रेबुवारी) रोजी उपजिल्हा रुग्णालयात सकाळी १० ते दुपारी ४ दरम्यान रक्तदान शिबिराचे आयोजित करण्यात आले आहे.
या रक्तदान शिबीरामध्ये
जास्तीत जास्त रक्तदात्यांनी सहभागी होऊन रक्तदान करावे असे आवाहन डॉ. संजय राऊत, डॉ. विशाल करपे, रक्त पेढी विभाग प्रमुख डॉ. श्रीकृष्ण नागरगोजे यांनी केले.