केज दि.२४ – काल आलेल्या रिपोर्टमध्ये केजमधून पाठवलेले सर्वच्या सर्व 33 रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने तालुक्याला चांगला दिलासा मिळाला आहे. मात्र आज पुन्हा तालुक्यातील होळ 14, पिसेगाव 4, केळगाव 2, साबला 1, सारणी (आ) येथील 1 आणि शहरातील 4 स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आल्याची माहिती केज कोव्हीड सेंटर चे प्रमुख डॉ. नंदकुमार नेहरकर यांनी दिली आहे.