बीड दि.१० – महाशिवरात्रीच्या च्या अनुषंगाने अन्न व औषध प्रशासनातर्फे किराणा दुकान व वितरक यांची तपासणी मोहिम राबविण्यात येणार असून खाद्यतेल, शाबुदाणा, भगर यांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात येणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन बीड यांच्या वतीने देण्यात आली आहे.
तर नागरीकांनी अन्न नोंदणी/परवानाधारक अन्न व्यवयायिकांकडुन अन्न पदार्थ विकत घ्यावेत. भगर, शाबुदाणा, खादयतेल विकत घेताना ते पॅकबंद व ब्रेन्डेडच विकत घ्यावे. भगर, शाबुदाणा, खादयतेल विकत घेताना त्यांचे उत्पादन केव्हा झाले याचा तपशील असतो तो पाहुन घ्यावा जसे की, मुदतबाहय दिनांक, समुह क्रमांक. तसेच खुले व पॅक बंद विना लेबल असलेली भगर व भगरीचे पीठ बाजारातुन विकत घेवु नये. भगर विकत घेतल्यानंतर ती स्वच्छ धुवुनच नंतरच खाण्यासाठी वापर करावा असे सुचवण्यात आले आहे. तर महाशिवरात्रीच्या अनुषंगाने विना बिलाने कोणतेही अन्न पदार्थ खरेदी व विक्री करु नये, ब्रॅन्डेड व चांगल्या उच्च प्रतीचीत भगर व पॅकबंदच अन्न पदार्थ विक्री करावे, खुली भगर विक्री करु नये, मुदतबाहय झालेले अन्न पदार्थ विक्री करु नये अशा व्यावसायिकांना सूचना देण्यात आल्या आहेत.
तर भंडारा व महाप्रसाद वाटप करणाऱ्या मंडळींनी तयार केलेला प्रसाद शक्यतो झाकुण ठेवावेत जेणेकरुन प्रसादाला धुळ, माती, माश्या व मुंग्या व किटकांचा प्रादुर्भाव होणार नाही. अन्न पदार्थ तयार करण्यासाठी वापरण्यात येणा-या खादयतेलाचा पुनर्वापर करु नये. दुध व दुग्ध जन्या पदार्थ ताजे तयार करावे, अन्न पदार्थ तयार करण्साठी वापरण्यात येणारे भांडी साबण अथवा निरम्याने स्वच्छ धुवुनच त्याचा वापर करावा, कच्चे अन्नपदार्थ, घटक पदार्थ यांचा खरेदी बिल तपशील व्यवस्थित ठेवावा.असे आवाहन सय्यद इम्रान हाश्मी (सहायक आयुक्त (अन्न) अन्न व औषध प्रशासन (म.रा) बीड) यांनी केले आहे.