Site icon सक्रिय न्यूज

केज – जीवाचीवाडी गाडीवर दगड मारले…..!

केज – जीवाचीवाडी गाडीवर दगड मारले…..!

केज दि.११ –  तालुक्यातील कानडी माळी येथे केज – जीवाचीवाडी गाडीवर दगडफेक केल्याने वाहकासह एक लहान मुलगी जखमी झाल्याची घटना घडली आहे.

                सायंकाळी सव्वा सहा च्या सुमारास केज जीवाचीवाडी गाडी ही केज बस स्थानकातून 47 प्रवासी भरून जीवाचीवाडी कडे निघाली होती. आणि त्याच गाडीमध्ये कानडी माळी येथील एक प्रवासी बसलेला होता. सदरील गाडी कानडी माळी बस स्थानकावर गेल्यानंतर प्रवासी उतरण्यासाठी गाडी थांबवली त्यावेळेस सदरील प्रवाशाने वाहकाला तू दरवाजा उघडून दे असे म्हणून वाहकाबरोबर हुज्जत घातली. हुज्जत घातल्यानंतर तो प्रवासी खाली उतरला आणि त्याने खिडकीतून दोन दगड मारले. त्यामध्ये वाहक दत्तात्रय नारायण गवळी आणि किरण अंकुश राठोड ही नऊ वर्षीय मुलगी जखमी झाले.
          सदरील प्रकार घडल्यानंतर चालक व वाहकांनी गाडी थांबवली आणि गाडी केज पोलीस स्टेशनला आणली असून दगडफेक करणाऱ्या प्रवाशा विरुद्ध केज पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली आहे.
शेअर करा
WhatsappFacebookTwitter
Exit mobile version