Site icon सक्रिय न्यूज

श्री क्षेत्र उत्तरेश्वर पिंपरी येथे महाशिवरात्री निमीत्त जय्यत तयारी……!

श्री क्षेत्र उत्तरेश्वर पिंपरी येथे महाशिवरात्री निमीत्त जय्यत तयारी……!
केज दि.१५ – तालुक्यातील जागृत देवस्थान असलेल्या उत्तरेश्वर पिंप्री येथे समस्त महाराष्ट्रातून महाशिवरात्रीला लाखो भाविक दर्शनासाठी येतात.भक्ती आणि मनोरंजन अशी दुहेरी पर्वणी तीन दिवस चालते. कोरोनाच्या काळात थोडासा खंड पडला होता.परंतु यावर्षी यात्रेची जय्यत तयारी सुरू आहे.
          श्री क्षेत्र उत्तरेश्वर (हनुमंत) पिंपरी ता. केज, जि. बीड या ठिकाणी प्रभुराम चंद्राने स्थापन केलेले पुरातन शिवलिंग असून या पावन पवित्र ठिकाणी माघ महिन्यात महाशिवरात्री पर्वकाळावर ५ दिवस मोठया प्रमाणात यात्रा भरते, या सोहळ्यामध्ये मंदिराचे सुशोभीकरण केले जाते तसेच विविध धार्मीक आयोजित केले जातात. त्यात मुख्य अकर्षण म्हणजे महाशिवरात्री पर्वकाळावर उत्तरेश्वर महादेव मंदिरात सायं ९ ते ११.३० हरिकिर्तन त्यामध्ये महादेवाची महती गायली जाते व नंतर १२ ते सकाळी ६ वाजे पर्यंत श्री उत्तरेश्वर बाबांचा पालखी सोहळा निघतो. सदर सोहळयात विविध परिसरातून येणाऱ्या दिंडया पालखी समोर भारुडांचा कार्यक्रम, अभंग गायन, पावले खेळणे, फटाक्यांची अतिशबाजी असे विविध कार्यक्रम साजरे होत असून पालखी दर्शन व कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी मोठया प्रमाणावर भावीक उपस्थित राहतात. तसेच अखंड हरिनाम सप्ताह व विविध ठिकाणी अन्नदानादी कार्यक्रम आयोजित केले जातात.
                गेली दोन वर्षे कोरोनामुळे यात्रोत्सवात खंड आला असल्यामुळे या वर्षी दि.१८/०२/२०२३ रोजी महाशिवरात्री पर्वकाळ असुन भावीकांची भरपुर गर्दी होणार आहे. या सोहळयासाठी येणाऱ्या भाविकांची सोयीसाठी ग्रामपंचायत कार्यालय नवोदित सरपंच, श्री सचिन अशोकराव चंदनशिव, सोसायटी चेअरमन महेश लक्ष्मणराव चंदनशिव व उपसरपंच, सर्व सदस्यासह तरुण वर्ग व ग्रामस्त, स्थानिक सर्व शासकीय कार्यालयातील अधिकारी / कर्मचारी वर्ग यांनी सर्व गांव स्वच्छ करुन घेतले असून ग्रामपंचायत कार्यालयाकडून सर्व ठिकाणी नवीन ५० पोल बसवून विद्युत पुरवठयाची पुर्नरचना केली आहे व आवश्यक त्या ठिकाणी जास्त वॅटचे एलईडी / मरक्युरी बसवण्यात आल्या आहेत. पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध व्हावे याकरिता बंद असलेली पाण्याचे सर्व स्त्रोत चालु करुन खराब झालेल्या पाईपलाईन नवीन टाकल्या आहेत. विविध ठिकाणी पाण्याचे पोस्ट, हौद तयार केल्यामुळे पाण्याची कमतरता भासणार नाही याची दक्षता घेतली जाणार आहे.
                    या वर्षीचा नवीन आणि मोठा बदल म्हणजे भाविकांना श्रींच्या दर्शनासाठी तासन् तास रांगेत उन्हात उभे रहावे लागत होते त्यांची सावलीत सोय व्हावी यासाठी श्री उत्तरेश्वर महादेव मंदिराच्या दक्षिणेकडील बाजुस रिकाम्या जागेत मोठा सभामंडप देवून दर्शन रांग मंडप तयार करण्यात आला असुन आवश्यक त्या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. दर्शन रांगेत बदल केल्यामुळे मंदिर परिसरामध्य बसणारे व्यापारी बांधवांना जागेची व्यवस्थाही ग्राम पंचायत कार्यालयाने केलेली आहे. कोणाचीही गैरसोय होणार नाही याची संपूर्ण दक्षता घेण्यात येणार असुन त्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयांतर्गत वेगवेगळ्या तरुण वर्गाच्या टिम सह मोठ्या प्रमाणावर एसआरपी व पोलिस बंदोबस्तही मागवण्यात आला आहे.
         दरम्यान, यात्रे निमित्त येणाऱ्या सर्व भाविक भक्त, व्यापारी बांधवानी याची नोंद घेवून सहकार्य करावे अशी अपेक्षा सरपंच सचिन अशोक चंदनशिव व से.स.सो. चेअरमन महेश लक्ष्मणराव चंदनशिव यांच्याकडून करण्यात आली आहे.
शेअर करा
Exit mobile version