केज दि.१५ – शेतातून घरी येत असताना समोरुन येणाऱ्या भरधाव जीपच्या धडकेत वृद्ध महिला व एक म्हैस जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना केज तालुक्यातील केज-कळंब रोडवर माळेगाव नजीक बुधवारी दि. १५ रोजी सायंकाळी सहा वाजता घडली.
अधिक माहिती अशी की, रुक्मिणी शंकर गुंठाळ (६५) या शेतातील कामे उरकून सायंकाळी सहा वाजेच्या सुमार म्हैस घेऊन आपल्या घरी परतत होत्या. त्यावेळी समोरून भरधाव येणाऱ्या (MH 23 E 4628) जीपने जोरदार धडक दिली. यात रुक्मिणी आणि सोबत असलेल्या दुभत्या म्हैशीचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती समजताच युसुफवडगाव पोलीस ठाण्याचे जमादार खेडकर, खनपटे हे घटनास्थळी दाखल होऊन मृतदेह ऍम्ब्युलन्स ने केज रुग्णालयात हलविला.
दरम्यान, अपघात घडल्यानंतर मद्याधुंद असलेल्या अनिल पारड (रा. मंजरथ ता. माजलगाव) या जीप चालकाने गाडी न थांबविता कळंबच्या दिशेने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र नागरिकांनी गाडीचा पाठलाग करून चालकाह जीप युसुफवडगाव पोलीस ठाण्यात लावली.