Site icon सक्रिय न्यूज

एएसपी पंकज कुमावत यांनी दिल्या परीक्षा केंद्रांना भेटी…..!

एएसपी पंकज कुमावत यांनी दिल्या परीक्षा केंद्रांना भेटी…..!

केज दि.21 – महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येत असलेल्या बारावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात झाली. कोरोना काळामध्ये जे नियम बदलले होते ते नियम आता लागू न करता कोरोनाच्या अगोदर ज्याप्रमाणे परीक्षा घेण्यात येत होत्या त्याप्रमाणे परीक्षा केंद्रावर परीक्षा सुरळीत सुरू झाल्या असून पहिल्याच दिवशी इंग्रजीचा पेपर पार पडला. तर परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पडाव्यात यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी आयपीएस पंकज कुमावत यांनी तालुक्यातील विविध केंद्रांना स्वतः भेटी दिल्या.

            दहावी आणि बारावीच्या परीक्षा वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर शिक्षण मंडळाने यावर्षी अतिशय शिस्तीमध्ये आणि कॉपीमुक्त वातावरणामध्ये परीक्षा घेण्याचे निश्चित केलेले आहे त्यानुसार प्रत्येक सेंटरवर बैठे पथकाची नेमणूक करण्यात आली असून पूर्वी विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी जो दहा मिनिटाचा अतिरिक्त वेळ दिला जात होता तो आता सुरुवातीला न देता शेवटी दहा मिनिट वाढवून देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे संवेदनशील परीक्षा केंद्रावर पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला असून वेगवेगळ्या प्रकारचे पथकांची ही नेमणूक करण्यात आलेली आहे परिरक्षक कार्यालयातून केंद्रावर प्रश्नपत्रिका आल्यानंतर त्या शील बंद आहेत की नाही याची खात्री करण्यासाठी केंद्र संचालकाच्या स्वाधीन करताना त्याचे चित्रीकरण करायचे आहे. आणि त्यानंतर अकरा वाजता वर्गामध्ये प्रश्नपत्रिका सीलबंद पाकीट घेऊन गेल्यानंतर विद्यार्थ्यांसमोर ते पाकीट फोडतानाचेही चित्रीकरण करायचे आहे.
                   दरम्यान केज उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी आयपीएस पंकज कुमावत यांनी केज तालुक्यातील अनेक परीक्षा केंद्रांना भेटी दिल्या. आणि त्या ठिकाणी परीक्षा कशा प्रकारे होत आहेत याचा आढावा घेतला. तसेच केंद्र संचालक आणि पर्यवेक्षकांना योग्य त्या सूचना देऊन कॉपीमुक्त वातावरणामध्ये परीक्षा पार पाडण्याचे आवाहन केले. जर कोणी परीक्षा दरम्यान गैरप्रकार करत असेल तर त्याच्यावर सक्त कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी यावेळी दिले.यावेळी एपीआय योगेश उबाळे, बालाजी दराडे यांचीही उपस्थिती होती.
शेअर करा
Exit mobile version