Site icon सक्रिय न्यूज

बारावीच्या इंग्रजी विषयाच्या पेपरमध्ये मोठी चूक……!

बारावीच्या इंग्रजी विषयाच्या पेपरमध्ये मोठी चूक……!
बीड दि.२१ – राज्यात बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेला आजपासून सुरवात झाली.मात्र पहिल्याच पेपरमध्ये मोठी चूक झाल्याचे निदर्शनास आले असून बोर्डाला त्याबाबत स्पष्टीकरण द्यावे लागले आहे.
              राज्य मंडळामार्फत घेण्यात येणारी बारावीची परीक्षा आजपासून सुरू झाली. बारावीच्या विद्यार्थ्यांचा इंग्रजी (०१) हा पहिला पेपर होता. या पेपरमध्ये कवितेवर आधारित तिसऱ्या (Q 3, a3 to a5) क्रमांकाच्या प्रश्नात प्रश्न विचारण्याऐवजी त्याठिकाणी उत्तर छापण्यात आले आहे.  तिन्ही प्रश्न प्रत्येकी दोन गुणांचे असून एकूण सहा गुणांचे प्रश्नांत चुक झाली आहे. प्रश्नपत्रिकेच्या छपाईत चुक झाल्याचे स्पष्टीकरण बोर्डाने  दिले आहे.
                      दरम्यान,  प्रश्नपत्रिकेत छपाईची चुक झाली असल्याचे दिसून येत आहे. प्रश्नपत्रिकेत दोन प्रश्न छापण्यात आलेले नाहीत, तर एका प्रश्नांऐवजी उत्तरच छापण्यात आले आहे. याबाबत परीक्षेचे नियामक, मुख्य नियंत्रकांचा अहवाल घेण्यात येईल. त्यात चूक निदर्शनास आल्यानंतर संबंधित प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केलेल्या विद्यार्थ्यांना 6 गुण मिळणार असल्याची माहिती बोर्डाने दिली.
शेअर करा
Exit mobile version