Site icon सक्रिय न्यूज

अखेर अभ्यासक्रम 25% होणार कमी

मुंबई दि.२५ – अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या विचार मंथनाला मूर्त स्वरूप आले असून अखेर पहिली ते बारावीचा अभ्यासक्रम २५ टक्के कमी करणार असल्याचा निर्णय राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केला आहे. २०२० आणि २१ हे शैक्षणिक वर्ष सुरु केलं आहे. ऑनलाइन, टीव्ही आणि इतर माध्यमातून आपण हे वर्ष सुरु केलं आहे. प्रत्यक्षात शाळा अजूनही सुरु झालेल्या नाहीत. शाळा उशिराने सुरू झाल्या तर पूर्ण अभ्यासक्रम शिकवणे शक्य नसल्याचे स्पष्ट आहे. म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचं वर्षा गायकवाड यांनी जाहीर केलं आहे. कमी केलेल्या अभ्यासक्रमाची यादी संचालक, राज्य शैक्षणिक व संशोधक परिक्षक यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान काल संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीतही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शाळा सुरू करणे लवकर शक्य नसल्याचे संकेत दिले आहेत. तर ऑनलाईन शिक्षणावर जास्तीत जास्त भर देण्याची गरज असल्याचेही सांगितले.

शेअर करा
Exit mobile version