Site icon सक्रिय न्यूज

केज उपजिल्हा रुग्णालयात दिव्यांग शिबिरात 384 दिव्यांगांची नोदंणी…..! 

केज उपजिल्हा रुग्णालयात दिव्यांग शिबिरात 384 दिव्यांगांची नोदंणी…..! 
केज दि.२५ – सामाजिक न्याय व आधिकारीता मंत्रालय भारत सरकार, जिल्हा समाजकल्याण विभाग जिल्हा परिषद बीड तथा यशवंतराव चव्हाण सेंटर ,महात्मा गांधी सेवा संघ औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग व्यक्तींना मोफत कृत्रिम अवयव,साहित्य व साधनांसाठी नोंदणी व तपासणी शिबीर केज येथील उपजिल्हा रुग्णालयात घेण्यात आले.
                     सदरिल दिव्यांग शिबिर  जिल्हा समाजकल्याण अधिकारी जि.प.बीड मा.रविंद्र शिंदे व वैसाका अंकुश नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आले. शिबीरामध्ये अस्थिव्यंग, मतिमंद, कर्णबधीर,अंध दिव्यांग अशा विविध प्रवर्गातील व्यक्तींच्या नोंदणी व तपासणी करण्यात आली. औरंगाबाद येथुन आलेले अस्थिरोग तज्ञ नसीम काजीम खान व कर्णबधीर तज्ञ ऋषीकेश सलगर यांनी अनेक अस्थिव्यंग व कर्णबधीर व्यक्तींची पाहणी केली व अंपग व्यक्तींच्या अवयवाचे मोजमाप केले.
             यावेळी वैद्यकिय अधीक्षक डॉ.संजय राऊत सर,श्रीकृष्ण नागरगोजे, भाजपा दिव्यांग सेलचे जिल्हाध्यक्ष धनंजय घोळवे उपस्थित होते. शिबिर यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक  विनायक ठोंबरे,मुख्याध्यापिका जनाबाई जाधव, मुख्याध्यापिका द्रौपदी सुर्यवंशी तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
शेअर करा
Exit mobile version