केज दि.२८ – शिक्षकांची सहकारी पतसंस्था मर्यादित केज ची निवडणूक अटीतटीच्या परिस्थितीत झाली. यामधे पतसंस्था विकास पॕनलला आठ जागेवर विजय मिळाला तर पतसंस्था बचाव पॕनलला सात जागा मिळाल्या होत्या. मात्र रमेश आडसकर यांच्या मार्गदर्शनाखाली बचाव पॕनलने बाजी मारली.आणि कल्याण काळे चेअरमन पदी तर संजय गलांडे यांची सचिवपदी निवड केली.
शिक्षक पत संस्था बचाव पॕनलला सात जागा मिळवून देखील रमेश आडसकर यांच्या मार्गदर्शनाखाली बचाव पॕनलने दणदणीत विजय मिळवत पतसंस्थेवर वर्चस्व मिळवले. मंगळवार दि. २८ रोजी शिक्षक पत संस्था निवडणूकित शेवटच्या क्षणी जादुची कांडी फिरली व बचाव पॕनलला दोन मते वळवण्यात यश आले. व कल्याण कळे यांचा चेअरमन पदावर दणदणीत विजय झाला. कल्याण काळे यांना नऊ व स्वाती शेप यांना सहा मते मिळाली. उपाध्यक्ष पदी अंकुशे विकास पॕनलचे यांची बिनविरोध निवड झाली. खजिनदार पदी किशोर भालेराव यांची निवड झाली .
निवडणूक निर्णय अधिकारी श्री. मोटे व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कुटे यांनी निवड जाहीर केली. सर्व संचालक व नवनिर्विचित पदाधिकारी यांचा आडसकर यांच्या निवासस्थानी सत्कार करण्यात आला. यावेळी दत्ता धस, अरूण धपाटे , राम जोगदंड यांच्या सहपॕनल प्रमुख लक्ष्मण घुले,श्री. उजगरे, आगे यांच्या सह अन्य मान्यवर उपस्थित होते.