केज दि.१ – तालुक्यातील आडस येथील सर्वपरीचीत व्यक्तिमत्व शाहूराव रामराव देशमुख यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय ७९ वर्षे होते.
केज तालुक्यातील आडस येथील दिलखुलास व्यक्तिमत्व म्हणून शाहूराव देशमुख हे परिचित होते. मात्र बुधवारी वृद्धापकाळाने त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यावर आडस येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी नातेवाईकांसह इतर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, एक मुलगा, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.ते केज कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रभारी सचिव संतोष देशमुख यांचे वडील होते.