केज दि.२५ – केज तालुक्यातून मागच्या कांही दिवसांपासून नियमित अहवाल पाठवण्यात येत आहेत. यामध्ये ग्रामीण भागासह शहराचाही समावेश आहे. दरम्यान आज पुन्हा तालुक्यातील १२ स्वॅब पाठवण्यात आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विकास आठवले व केज कोव्हीड केंद्राचे प्रमुख डॉ.नंदकुमार नेहरकर यांनी दिली. आज पाठवण्यात आलेल्या स्वॅब मध्ये केज शहर ५ पिसेगाव ५ लहुरी १ तर कुंबेफळ च्या एकाचा समावेश आहे. सदरील स्वॅब चे अहवाल रात्री उशिरापर्यंत येण्याची शक्यता आहे.