(उमरी रस्त्याचे भिजत घोंगडे, पहा वरील व्हिडिओ)
केज दि.९ – अखंड हरिनाम सप्ताहाच्या बॅनर वर दुसऱ्या व्यक्तीचा फोटो का लावला म्हणून युवा कीर्तनकार महाजांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देऊन उभ्या चार चाकी गाडीच्या काचा फोडल्याची घटना केज तालुक्यातील साळेगाव शिवारात (दि. ७) मंगळवारी सायंकाळी घडली याप्रकरणी केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
गणेश महाराज जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली साळेगाव शिवारात स्वतःच्या जागेत मंदिराचे बांधकाम सुरू आहे. तसेच संत एकनाथ महाराज षष्ठी निमित्त भव्य अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन केले आहे. सप्ताहाच्या नियोजनासाठी काही लोकांसोबत चर्चा करत असताना संतोष गित्ते (रा. साळेगाव) हा दारू पिऊन तिथे आला अन सप्ताहात येणाऱ्या भाविकांच्या स्वागतासाठी छापलेल्या डिजिटल बॅनरवर दुसऱ्याचा फोटो का टाकला म्हणून विनाकारण शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच मंदिर बांधकामा समोर उभी असलेल्या (एम एच २५ आर ६८८०) या चार चाकी गाडीच्या सर्व बाजूंच्या काचा फोडून नुकसान केले आहे.
याप्रकरणी गणेश महाराज जोगदंड यांच्या तक्रारीवरून संतोष गित्ते याच्यावर केज पोलीस ठाण्यात कलम ४२७,५०४,५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोना काळकुटे हे करत आहेत.