Site icon सक्रिय न्यूज

भारतात ”या” आजाराचा संसर्ग वाढत आहे…..!

भारतात ”या” आजाराचा संसर्ग वाढत आहे…..!
 कोरोनाच्या उद्रेकाने जगभरात हाहाकार माजवला होता.यामध्ये लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला.मात्र त्याचा कहर कमी होऊन जनजीवन पूर्वपदावर आले आहे. परंतु आता एक नवीनच संकट निर्माण होण्याची भीती आहे. भारतात नव्या H3N2 इन्फ्लूएंझा विषाणूच्या संसर्ग होऊन हळूहळू रुग्ण वाढत आहेत. देशातील कर्नाटक आणि हरियाणामध्ये दोन जणांचा मृत्यू झाल्यानंतर केंद्र सरकार आता सतर्क झाले असून नीती आयोगाच्या बैठकीत केंद्र सरकारने नागरिकांना सार्वजनिक/गर्दीच्या ठिकाणी जाताना मास्क वापरण्याचं आवाहन केलं आहे.
                      भारतात या विषाणूचे आतापर्यंत 3 हजारांहून अधिक रूग्ण आढळले आहेत, त्यामुळेच सरकारने गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच सुरक्षित अंतर ठेवण्याच्याही सुचना दिल्या गेल्या आहेत. राज्यांनी आवश्यक औषधांचा पुरेसा साठा, मनुष्यबळ, वैद्यकीय ऑक्सिजन आणि उपकरणे यांची उपलब्धता सुनिश्चित करावी. तर रुग्णांचं बारकाईने निरीक्षण करावं, असं सांगितलं आहे.
            आयोगाने एक प्रसिद्धीपत्रक जारी करत माहीती दिली की, नागरिकांनी नाक व तोंड झाकणे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे, लक्षणे असलेल्या लोकांच्या संपर्कात येऊ नका आणि लक्षणे आढळल्यास चाचणी करण्याचा सल्ला राज्यांना देण्यात आल्याचे आयोगाने म्हटले आहे. नीती आयोगाच्या बैठकीत कोविड टास्क फोर्स, केंद्रीय आरोग्य सचिव, राज्य आरोग्य अधिकारिही उपस्थित होते. सध्या देशात सर्दी, ताप आणि खोकला या आजाराच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. सर्दी, ताप, खोकला, वाहणारं नाक तसेच शरीरदुखी, मळमळ, उलट्या किंवा जुलाब ही H3N2 इन्फ्लूएंझा संसर्गाची लक्षणे आहेत. यावर केंद्राने राज्यांना पत्र लिहीत कोविड प्रोटोकॉलचे पालन करा असा सल्ला दिला आहे. तसेच हात नियमितपणे स्वच्छ धुवा. विशेषत: टॉयलेटनंतर, जेवणाआधी, चेहरा किंवा नाकाला स्पर्श करण्यापूर्वी हात साबणाने धुवा, अशी स्वच्छता ठेवा.
शेअर करा
Exit mobile version