Site icon सक्रिय न्यूज

अकोला येथे झालेल्या पोलीस प्रशिक्षण सत्रात बीडचे शिंदे चमकले…..! 

अकोला येथे झालेल्या पोलीस प्रशिक्षण सत्रात बीडचे शिंदे चमकले…..! 
बीड दि.१४ – पोलीस प्रशिक्षण केंद्र, अकोला येथे दिनांक २०.०२.२०२३ ते दिनांक ०४.०३.२०२३ या कालावधीत २० वर्ष सेवा पुर्ण झालेल्या पोलीस अंमलदार यांचे प्रोफेशनल स्कील अपग्रेडेशन PSU -२ सत्र क्र. ३ चे प्रशिक्षण पुर्ण झालेले आहे. प्रशिक्षण पुर्ण झाल्यानंतर ज्या तीन प्रशिक्षणार्थी यांना सर्वाधीक गुण मिळतील अशा प्रथम ३ प्रशिक्षणार्थीना पोलीस महासंचालक, प्रशिक्षण व खास पथके, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे आदेशान्वये प्रत्येकी रुपये ५०००/- व जी.एस.टी मंजुर करण्यात आली.यामध्ये बीडजिल्हा पोलीस दलातील पोलीस कर्मचारी परमेश्वर शिंदे यांनी नेत्रदीपक यश मिळवत दोन स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावला.
                                           प्रोफेशनल स्किल अपग्रे डेशन-2 मध्ये महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यातील दोनशे पोलिस अंमलदार यांनी प्रशिक्षण घेतले. सदर प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर घेण्यात आलेल्या योगा परीक्षेमध्ये 50 पैकी 46 गुण मिळवून प्रथम क्रमांकाचे बक्षीस पाच हजार रुपये व जीएसटी तसेच इन डोअर डोअर परीक्षेमध्ये 200 गुणांपैकी 170 गुण मिळवून प्रथम क्रमांकाचे बक्षीस पाच हजार रुपये व जीएसटी असे दोन बक्षीस बीड जिल्हा पोलीस दलातील पोलीस ठाणे बीड येथे कार्यरत असलेले पोह परमेश्वर कोंडीबा शिंदे यांनी मिळवले.

          त्यांच्या या कामगिरीबद्दल  पोलीस अधीक्षक  नंदकुमार ठाकूर, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर साहेब यांनी शुभेच्छा देऊन सत्कार केला.

शेअर करा
Exit mobile version