Site icon सक्रिय न्यूज

केज कोर्टाचे मा. खा. निलेश राणे यांना समन्स…..!

केज कोर्टाचे मा. खा. निलेश राणे यांना समन्स…..!
केज दि.२८ – वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांच्या संदर्भाने केलेल्या अवमानकारक वक्तव्याप्रकरणी केज पोलिसात दाखल गुन्ह्यात माजी खासदार निलेश राणे हे उद्या (बुधवारी )केजच्या न्यायालयात हजेरी लावणार आहेत. २०२० मध्ये निलेश राणे आणि इतरांविरुद्ध केज पोलिसात भावना दुखावल्याचा गुन्हा दाखल झाला होता .
           दोन वर्षांपूर्वी निलेश राणे यांनी ‘वंचित’चे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यासंदर्भाने केलेल्या अवमानकारक पोस्ट प्रकरणात वंचितचे केज तालुकाध्यक्ष बाबासाहेब विठ्ठल मस्के यांच्या फिर्यादीवरून निलेश राणे यांच्यासह विवेक अंबाड, रोहन चव्हाण यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या प्रकरणाची सुनावणी सध्या केज न्यायालयात सुरु आहे. यासाठी न्यायालयाने निलेश राणे यांना समन्स बजावले असून त्यासाठी बुधवारी (दि. २९ ) निलेश राणे केज न्यायालयात हजेरी लावणार आहेत. निलेश राणे यांच्या वतीने एम. व्ही. तपसे हे बाजू मांडणार आहेत.
शेअर करा
WhatsappFacebookTwitter
Exit mobile version