Site icon सक्रिय न्यूज

माजी खासदार निलेश राणे यांना जामीन मंजूर…..!

माजी खासदार निलेश राणे यांना जामीन मंजूर…..!
केज दि.२९ – वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्याची सुनावणी केज कोर्टात असल्याने जामीनासाठी आज माजी खा.निलेश राणे हे केजमध्ये केज न्यायालयात दाखल झाले. न्यायालयासमोर हजर झाल्यानंतर 20 हजाराच्या जात मुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला. निलेश राणे यांच्यावर दोन समाजात जातीय तेढ निर्माण केल्याचा ठपका आहे. तर पुढील तारखेस निलेश राणे यांना कोर्टात हजर राहण्याबाबत अट घालण्यात आली आहे.
                     निलेश राणे यांनी  बहुजन वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची बदनामी केली असल्याची तसेच दोन समाजामध्ये तेढ निर्माण केली म्हणून त्यांच्या विरोधात केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाची सुनावणी गेल्या काही दिवसांपासून केज न्यायालयात सुरू होती. राणे सातत्याने गैरहजर असल्याने त्यांच्यावर अटक वॉरंट निघण्याची शक्यता असल्याने आज निलेश राणे हे जामीनासाठी केज न्यायालयासमोर हजर झाले.
                       दरम्यान, यापूर्वी अंबाजोगाई जिल्हा न्यायालयाने 20 हजार रुपयाच्या जातमुचलक्यावर जी जामीन दिली होती त्याच जातमुचलक्यावर आज केज न्यायालयाने जामीन कायम ठेवली. निलेश राणे हे कोर्टात येणार असल्याने न्यायालय परिसरात मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. फिर्यादीच्या वतीने ऍड. सतीश मस्के  तर निलेश राणे यांच्यावतीने अ‍ॅड.महादेव तपसे यांनी काम पाहिले
शेअर करा
Exit mobile version