Site icon सक्रिय न्यूज

अधिपरिचारिका सविता (भोपळे) सत्त्वधर जिल्हास्तरीय प्रथम पुरस्काराने सन्मानित….!

अधिपरिचारिका सविता (भोपळे) सत्त्वधर जिल्हास्तरीय प्रथम पुरस्काराने सन्मानित….!
केज दि. २९ – उपजिल्हा रुग्णालयातील आधिपरिचारिका सवीता भारत सत्वधर (भोपळे) यांना जिल्हास्तरीय फ्लोरेन्स नाईटींगेल पुरस्कार  प्रथम पुरस्कार देण्यात आला.तर द्वितीय पुरस्कार  केज उपजिल्हा रुग्णालयाच्या आधिपरीचारीका  त्रिशाला कराड यांना देण्यात आला.
              बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी आधिकारी अजित पवार,  बीड जिल्हा आरोग्य आधिकारी  डॉ. अमोल गित्ते यांच्या हस्ते सदरील पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावर्षी चा प्रथम आणि द्वितीय पुरस्कारही केज उपजिल्हा रुग्णालय विभागाने पटकावला असल्याने केज आरोग्य विभागाच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा रोवला गेला .
           पुरस्कार मिळाल्याबद्दल तालुका वैद्यकीय आधिकारी डॉ.विकास आठवले. वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय राऊत यांच्यासह विविध क्षेत्रातून अभिनंदन केले जात आहे.
वार्षिक कालावधीमध्ये  सेवेचे उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल त्यांची निवड करण्यात आली. रोख रक्कम सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
शेअर करा
Exit mobile version