Site icon सक्रिय न्यूज

अल्पवयीन मुलीचे अपहरण, केज पोलीसांत गुन्हा नोंद….!

अल्पवयीन मुलीचे अपहरण, केज पोलीसांत गुन्हा नोंद….!

Kidnapped typographic stamp. Typographic sign, badge or logo

केज दि.३० – अल्पवयीन मुलीला तिच्या बाहेरगावी बसलेल्या आई वडिलांकडे नेऊन सोडण्याच्या बहाण्याने मोटार सायकलवरून अपहरण केले. सदर प्रकरणी तिघांवर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

केज तालुक्यातील एका गावातील पती-पत्नी हे त्यांची अल्पवयीन मुलगी व मुलाला घरी ठेवून ते कळंब येथे नातेवाईकांच्या लग्नाला गेले होते. एक दिवस मुक्कामी राहून ते दोघे दि. २४ मार्च रोजी ते परत गावी आले. मात्र त्यांना त्यांची मुलगी घरी आढळून आली नाही. त्यांनी मुलाकडे चौकशी केली असता त्यांच्या मुलाने सांगितले की, बहिणीला सतीष दिलीप खंडागळे हा तिला मोटार सायकलीवर घेऊन गेला आहे. त्याच्या सोबत प्रकाश दिलीप खंडागळे  व मनोहर भांगे हे दोघे होते. अपहृत अल्पवयीन मुलीचा शोध घेतला असता ती आढळून आली नाही. म्हणून दि. २८ मार्च रोजी मुलीच्या आईच्या फिर्यादी वरून केज पोलीस ठाण्यात  तिघां विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वैभव सारंग हे पुढील तपास करीत आहेत.

शेअर करा
Exit mobile version