Site icon सक्रिय न्यूज

अल्पवयीन मुलीची आत्महत्या…..!

अल्पवयीन मुलीची आत्महत्या…..!

बीड दि.३० – तीन दिवसांपूर्वी आष्टी तालुक्यातील बीडसांगवी येथे आजोळी राहणाऱ्या एक अल्पवयीन मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती. सदर घटना ताजी असतानाच बीडसांगवी गावाजवळच असलेल्या वेताळवाडी येथिल एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीने गळफास घेऊन बुधवारी रात्री जिवनयात्रा संपवली आहे. 

          अधिक माहिती अशी की, तालुक्यातील वेताळवाडी येथील प्रतिक्षा सुरेश वनवे (१६) हिने बुधवार दि. 29 रोजी रात्री 7 वा. च्या दरम्यान राहत्या घरात ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. नातेवाईकांच्या माहितीनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी रवाना करण्यात आला. 
          दरम्यान, आत्महत्याचे कारण अद्याप समजू शकले नाही. आष्टी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे.
शेअर करा
Exit mobile version