किल्लेधारूर दि.1- धारुर घाटात बर्निंग कारचा थरार आज दि.1 एप्रिल शनिवारी सकाळी नऊ वाजता अनेकांनी अनुभवला. माजलगावकडे जाणारी टाटाची (TATA) कार घाटात एका वळणावर अचानक पेटली मात्र सुदैवाने यात कसलीही जिवितहानी झालेली नाही.
धारुर घाटात आज पेटत्या कारचा थरार अनेकांनी अनुभवला. घाटाच्या पायथ्याजवळील वळणावर टाटा ( TATA ) कंपनीची इंडीगो कार क्र. एमएच 14 सीएस 5352 आज सकाळी 9 च्या सुमारास माजलगावकडे जात असताना अचानक पेट घेतला. सदर कार पेटलेल्या अवस्थेत असताना जवळपास बघ्यांची मोठी गर्दी होती. कार मालक आणि पेट घेतल्याच्या कारणाचा पोलीस शोध घेत आहेत.