केज दि.१ – बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पा अंतर्गत बीड जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या प्रतिनिधींसाठी मध्यप्रदेश राज्यात कृषी संशोधन केंद्र,कृषी विषयक प्रकल्पांमध्ये अभ्यास व प्रशिक्षण दौरा दि. २५ मार्च ते ३१ मार्च 2023 या कालावधीत संपन्न झाला. जिल्ह्यातील एकूण ९५ शेतकरी व महिला प्रतिनिधी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.
कृषी विषयक नवनविन तंत्रज्ञान, संशोधन याबाबतची माहिती मिळावी व शेतकरी यांनी आपल्या शेतात या संशोधनाचा, तंत्रज्ञानाचा अवलंब करावा, शेतकरी सक्षम बनावेत आणि तंत्रज्ञान प्रसारामध्ये त्यांचा सहभाग वाढावा या उद्देशाने आयोजित सात दिवशीय शेतकरी अभ्यास दौऱ्यात मध्यप्रदेश राज्यातील बुराहनपूर, धामणगाव, खांडवा, ओंकारेश्वर, इंदौऱ, खार, देवास, महू, उज्जैन, खारगाव याठिकाणच्या कृषी संशोधन केंद्रांना कृषी प्रक्रिया उद्योग क्षेत्रात भेटी देऊन प्रशिक्षण सत्रे आयोजित करून तज्ञांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यात केळीच्या खोडापासून धागा निर्मिती, शेंद्रिय शेती, सोयाबीन पीक लागवड व निगा, फळ प्रक्रिया, पशुसंवर्धनाच्या पद्धती, जमिनीतील शेंद्रिय कर्ब वाढविण्याच्या पद्धती तसेच उत्पादन खर्च कमी करून उत्पादन वाढीच्या पद्धती या विषयातील बारकावे तज्ञांनी शेतकऱ्यांना समजून सांगितले.
सदरील दौरा यशस्वी पार पाडण्यासाठी आत्माचे तंत्रज्ञान व्यवस्थापक ए.ए.जिंतपुरे, ए.डी.मुंडे, एस.व्ही.जाधव, पी.एल.धुताडमल यांनी परिश्रम घेतले.