Site icon सक्रिय न्यूज

7500 पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी…….!

7500 पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी…….!
कर्मचारी निवड आयोग (SSC) ने SSC CGL परीक्षा 2023 साठी अधिसूचना जारी केली आहे. अधिसूचना जारी झाल्यानंतर या अर्जाची प्रक्रिया देखील आज, 3 एप्रिल 2023 पासून सुरू झाली आहे. उमेदवार अधिकृत वेबसाइट ssc.nic.in वरून 3 मे 2023 पर्यंत अर्ज करू शकणार आहेत.
                  या भरती प्रक्रियेद्वारे, गट ‘ब’ आणि गट ‘क’ च्या विविध पदांसाठी एकूण सुमारे 7500 रिक्त जागा भरल्या जातील. उमेदवार 7 ते 8 मे 2023 या कालावधीत त्यांच्या ऑनलाइन अर्जात दुरुस्ती देखील करू शकतात. जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, टियर 1 CBT परीक्षा जुलै 2023 मध्ये आयोजित केली जाईल.
या विविध पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवार हा कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे आवश्यक आहे. अधिक पात्रता संबंधित माहितीसाठी, उमेदवार जारी केलेली अधिसूचना तपासू शकतात. काही पदांसाठी वयोमर्यादा 18 वर्षे ते 27 वर्षे तर काहींसाठी 18 ते 30 वर्षे निश्चित करण्यात आली आहे. कमाल वयोमर्यादेत ओबीसी उमेदवारांना 3 वर्षे आणि एससी आणि एसटी उमेदवारांना 5 वर्षे सूट देण्यात आली आहे.
                अर्जाची फी ही 100 रुपये आहे. महिला उमेदवार आणि अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), अपंग व्यक्ती (PWBD) आणि आरक्षणासाठी पात्र माजी सैनिक (ESM) यांना फी भरण्यापासून सूट देण्यात आली आहे. फी ऑनलाईन पध्दतीने 4 मे पर्यंत भरता येणार आहे. टियर 1 आणि टियर 2 परीक्षेद्वारे अर्जदारांची निवड केली जाईल. टियर 1 च्या परीक्षेतील यशस्वी उमेदवार टियर 2 च्या परीक्षेला बसतील. तर टियर 1 परीक्षा ही जुलै 2023 मध्ये प्रस्तावित आहे.

अर्ज करण्याची पध्दत…..!

सर्व उमेदवारांनी सर्वप्रथम ssc.nic.in या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.
होम पेजवर दिलेल्या अप्लाय बटनवर .
आवश्यक तपशील भरून रजिस्ट्रेशन करा. त्यानंतर तुमची शैक्षणिक कागदपत्रे अपलोड करा. अर्जाची फी भरा आणि सबमिट करा.
शेअर करा
Exit mobile version