Site icon सक्रिय न्यूज

सीआरपीएफ कॉन्स्टेबल पदांची मेगा भरती…..!

सीआरपीएफ कॉन्स्टेबल पदांची मेगा भरती…..!
केंद्रीय गृह मंत्रालयाने केंद्रीय राखीव पोलीस दलात (सीआरपीएफ) (CRPF Constable Recruitment 2023 ) कॉन्स्टेबल रँकच्या पदांच्या भरतीसाठी अधिसूचना काढली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेच्या अपडेटनुसार, सीआरपीएफ कॉन्स्टेबल भरतीसंदर्भातील अधिसूचना मंत्रालयाने बुधवारी काढली असून सुमारे 1.30 लाख उमेदवारांची भरती केली जाणार आहे.
                CRPF कॉन्स्टेबल भरती 2023 च्या अधिसूचनेनुसार, गट C अंतर्गत वेतन-स्तर 3 (रु. 21,700- रु. 69,100) च्या वेतनश्रेणीवर कॉन्स्टेबलच्या रिक्त पदांवर भरती केली जाणार आहे. मंत्रालयाने जारी केलेल्या सूचनेनुसार, एकूण 129929 पदांची भरती केली जाणार असून त्यापैकी 125262 पदे पुरुष उमेदवारांसाठी आहेत आणि 4467 पदे महिला उमेदवारांसाठी आहेत. कॉन्स्टेबल पदाच्या भरतीसाठी, 10 टक्के रिक्त जागा माजी अग्निवीरांसाठी राखीव असतील.
          गृह मंत्रालयाच्या अधिसूचनेमध्ये या पदांसाठी रिक्त जागा सामायिक केल्या गेलेल्या नाहीत. त्यामुळे उमेदवारांना CRPF कॉन्स्टेबल भरती 2023 ची अधिसूचना आणि CRPF च्या अधिकृत वेबसाइट crpf.gov.in आणि rect.crpf.gov.in या भरती पोर्टलवर अर्ज प्रक्रिया सुरू झाल्याबद्दलची सविस्तर माहिती पाहवी. गृह मंत्रालयाच्या CRPF कॉन्स्टेबल भर्ती 2023 नियमांशी संबंधित अधिसूचनेनुसार केवळ तेच उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत ज्यांनी मान्यताप्राप्त बोर्डातून मॅट्रिक (इयत्ता 10) परीक्षा उत्तीर्ण केली आहे किंवा इतर कोणतीही समकक्ष पात्रता आहे.
          दरम्यान, विहित कट-ऑफ तारखेनुसार उमेदवारांचे वय 18 वर्षांपेक्षा कमी आणि 23 वर्षांपेक्षा जास्त नसावे. तथापि, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना केंद्र सरकारच्या नियमांनुसार उच्च वयोमर्यादेत सवलत दिली जाईल असे अधिसूचनेत म्हटले आहे.
शेअर करा
Exit mobile version