केज दि.७ – ज्याप्रमाणे देशात कोरोना रुग्ण संख्या वाढू लागली आहे त्याचप्रमाणे बीड जिल्ह्यात ही रुग्णांचा आलेख वाढत चालला आहे.
आज दि.७ रोजी जाहीर करण्यात आलेल्या अहवालात बीड 1, गेवराई 2, माजलगाव 2 तर वडवणी तालुक्यात 1 रुग्ण आढळून आला आहे.
दरम्यान, देशात वाढत चाललेल्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारही अलर्ट मोडवर आले असून राज्यांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.त्यामुळे नागरिकांनीही गर्दीच्या ठिकाणी मास्क आणि इतर सुरक्षा पाळण्याची गरज आहे.