केज दि.८ – तालुक्यात सकाळपासूनच आभाळ दाटून आलेले होते.आणि त्याने आपला परिणाम दाखवलाच.दुपारी तालुक्यातील कांही भागात पाऊस तर कांही ठिकाणी गाराही पडल्या. दुष्काळात तेराव्या प्रमाणे पुन्हा शेतकरी अडचणीत सापडला आहे.
शनिवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते.आणि दुपारी दोनच्या सुमारास तालुक्यातील कांही गावात रिमझिम पाऊस पडला. तर तालुक्यातील विडा, शिरूर आणि परिसरात गाराही पडल्या.केज शहरातही रिमझिम सुरू आहे. वातावरण बदल झाल्याने अगोदरच पिकांवर रोगराई पडली असून आता गारा पडल्याने फळबागांसाह इतर पिकांचे नुकसान झाले आहे.
दरम्यान, यावर्षी हवामान वेगळेच दिसत असून दिवसभर कडक ऊन अन रात्री गारवा असे वातावरण अनुभवयास मिळाले असून त्यात आता पावसाची अन गारांची भर पडली आहे.