केज दि.१३ – तालुक्यामध्ये एक दुर्दैवी घटना घडली असून वीज पडून एक शाळकरी मुलगा मृत्युमुखी पडल्याची घटना घडली आहे.
गुरुवारी सायंकाळी पाचच्या सुमारास केज तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट सुरू झाला. जोरदार पाऊस येतो की काय असे वातावरण निर्माण झाले होते मात्र अद्याप पावसाला सुरुवात झालेली नसली तरी मात्र युसूफ वडगांव येथे वीज कोसळून संकेत गित्ते या शाळकरी मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यामुळे मागच्या आठ दिवसापासून तालुक्यामध्ये सुरू झालेला हाहाकार अद्यापही सुरूच आहे. त्यामुळे तालुक्यात मोठ्या प्रमाणावर जीवित हानी आणि शेतीचे नुकसान होऊ लागलेले आहे.