केज दि.१५ – तालुक्यातील तांबवा येथे मागील तीन दिवसांपासून लाईट नसल्यामुळे महिलांनी अधिकाऱ्यांना कोंडून ठेवले.
मागच्या तीन दिवसांपुर्वी पाऊस पडला त्यामुळे तालुक्यात लाईट गेली आहे ती अद्यापपर्यंत आलेली नाही. शहरात आकरा डिपी बंद आहेत तर कांही खेडे गाव गेल्या तीन दिवसांपासून अंधारात आहेत. याचे कोणत्याच अधिकाऱ्यांना सोयरसुतक नाही.अधिकारी मुख्यालयी न रहाता बाहेर गावाहून ये जा करतात.फोन नेहमीच बंद असतात.पाठी मागील काळात 10 MVA चा डिपी फेल झाला म्हणून भोपाळ येथे दुरुस्त करण्यास पाठवला. त्या काळात ही एक महिना शहर व काही खेडेगावात आंधार होता. कसा तरी डिपी दुरुस्त केला तर तो दुरुस्तच झाला नाही अशी आवई अधिकार्यानी उठवली. मात्र मागच्या चार दिवसांपासून आंधारात असलेल्या गावांपैकी तांबवा गावातील महिलांनी महावितरण चे आधिकारीच कोंडून ठेवले.
दरम्यान, घरात पाणी, पिठ कांहीच नाही.जोपर्यंत विज पूर्ववत करत नाहीत तोपर्यंत अधिकाऱ्यांना कोंडून ठेवणार असल्याचा इशारा महिलांनी दिल्याने संघर्ष निर्माण झाला आहे.