Site icon सक्रिय न्यूज

”कारभारी दमानं” फेम लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर केज तालुक्यात…..!

”कारभारी दमानं” फेम लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर केज तालुक्यात…..!
केज दि. १५ – लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या तालुक्यातील दहीफळ वडमाऊली येथे तिर्थक्षेत्र असलेल्या वडजुआई ( वडमाऊली ) देवीचा यात्रा महोत्सव दि.१७ एप्रिल सोमवार पासुन सुरू होत आहे. या यात्रेनिमीत्त दि.१७ ते २१ एप्रिल दरम्यान होत असलेल्या विविध कार्यक्रमाला पंचक्रोशितील भावीक भक्तानी मोठ्या संख्येने उपस्थित राहून यात्रेची शोभा वाढवावी असे आव्हान यात्रा कमिटीचे अध्यक्ष येडूनाना ठोंबरे, सचिव भिकचंद ठोंबरे, सदस्य हरीमास्तर ठोंबरे सह सर्व सदस्यांनी केले आहे.
                   दहीफळ वडमाऊली येथे तिर्थक्षेत्र वडजुआई देवीचे मंदीर आहे दरवर्षी चैत्र महीन्यातील अष्टमी पासुन या यात्रेला सुरुवात होतेे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही दि.१७ एप्रिल सोमवार रोजी सकाळी देवीची पालखी दहीफळ येथून बॅंड लेझीम पथक व आराधी मंडळी देवीची गाणे गाऊन पालखी महोत्सवात सहभागी होतात. या वडजुआई ( वडमाऊली ) देवीला महीला पुरणपोळीचा नैवद दाखवुन जेवणाचा कार्यक्रम करतात. यात्रेनिमित्त दहीफळ वडमाऊली येथील पंचायत समिती सदस्य दत्तात्रय ठोंबरे, सरपंच डाॅ.शशिकांत दहिफळकर,
राहूल गदळे, शरद गदळे यांनी व यात्रा कमिटीचे कमिटीचे अध्यक्ष येडूनाना ठोंबरे, सचिव भिकचंद ठोंबरे, सदस्य हारी मास्तर ठोंबरे सह सर्व सदस्यांनी व गावक-यांनी पुढाकार घेऊन ग्रामीण भागातील जनतेच्या  मनोरंजनासाठी १७ एप्रिल सोमवारी संध्याकाळी आठ वाजता चैत्रालीचा नाद करायचा नाय हा कार्यक्रम. तर दुस-या दिवशी मंगळवारी (दि.१८) संध्याकाळी आठ वाजता कारभारी दमानच्या मुख्य गायिका सुरेखा पुणेकर यांच्या लावण्यांचा बहारदार कार्यक्रम आयोजित केला आहे. बुधवारी आराधी गीताचा कार्यक्रम आयोजित केला आहे. गुरूवारी संध्याकाळी वडमाऊली देवी मंदीर परीसरात देवीचा छबीना  मिरवणूक होईल व  शुक्रवारी संध्याकाळी दहिफळ गावात छबिना मिरवणूकीने यात्रेची सांगता होणार आहे.
                    या आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमात यात्रेकरुंनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून यात्रेची शोभा वाढवावी असे आव्हान वडमाऊली यात्रा कमिटी तसेच गावक-यांनी केले आहे.
शेअर करा
WhatsappFacebookTwitter
Exit mobile version