बीड दि.23 – जिल्ह्यात पोलीस अधिक्षकांच्या विशेष पथकाने अवैध धंद्यांवर कारवायांचा धडाका लावला आहे. मागच्या महिन्यापासून अनेक ठिकाणी धाडी टाकून कित्येक गुन्हेगार जेरबंद केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून बीड तालुक्यातील एका जुगार अड्ड्यावर धाड टाकून सात जणांवर कारवाई केली आहे.
अधिक माहिती अशी की,
दिनांक 23 एप्रिल रोजी दुपारी 4.20 वाजताच्या दरम्यान बीड पिंपळनेर रोडवर म्हाळस जवळा फाट्यावर दोस्ती हॉटेलच्या शेजारी खुल्या छपरामध्ये नितीन चिंतामण खांडे यांच्या मालकीचे जुगाराच्या अड्ड्यावर छापा मारला असता सात इसमांना जागीच पकडण्यात आले. त्यांच्याकडून 7,500 नगदी रक्कम तसेच मोबाईल व जुगाराचे साहित्य, मोटरसायकल असे एकूण 2,18,500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.तर शेख शकीर शेख दगडू राहणार पिंपळनेर ता.जि. बीड, नितीन चिंतामण खांडे राहणार पिंपळगाव तालुका जिल्हा बीड, दिनकर सुदाम माने राहणार पिंपळगाव, दत्तू दुधाजी पवार राहणार गंगनाथ वाडी, प्रकाश मोतीराम कानडे राहणार राजकपूर, सय्यद अफसर अब्दुल राहणार म्हाळ जवळा, विठ्ठल साहेबराव कानडे राहणार रजकपूर असे सातजन जुगार खेळताना मिळून आले. सात जणांविरुद्ध कलम 12 (अ )महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम अन्वये पिंपळनेर पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर,अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे प्रमुख सपोनी विलास हजारे तसेच पथकातील कर्मचारी पोलीस शिपाई सचिन काळे, शिवाजी डीसले, विनायक कडू, यांनी केली आहे.