Site icon सक्रिय न्यूज

केजची बाजार समिती भाजपच्या ताब्यात……!

केज दि.२९ – केज कृषी उत्पन्न बाजारसमितीच्या 18 पैकी 14 जागांवर विजय मिळवत भाजपचे रमेश आडसकर यांनी बाजार समिती ताब्यात ठेवली आहे. तर राष्ट्रवादीला चार जागेवर समाधान मानावे लागले आहे.

केज बाजार समितीच्या 15 जागांकरिता 28 एप्रिल रोजी मतदान झाले होते. आज (शनिवार) सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास शिक्षक पतपेढी या ठिकाणी मतमोजणीस सुरुवात झाली. यात सेवासहकारी सोसायटीच्या 11 पैकी 11 जागांवर रमेश आडसकर व आ. नमिता मुंदडा गटाचे सर्वच उमेदवार 150 हून अधिक मतांनी विजयी झाले.

             दरम्यान, यापूर्वीच 3 जागांवर आडसकर व मुंदडा गटाचे तीन उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने बाजारसमितीच्या 18 पैकी 14 जागा ताब्यात घेत त्यांनी आपले निर्विवाद वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. बाजारसमितीच्या स्थपनेपासूनच यावर कायम आडसकर कुटुंबाचे वर्चस्व राहिलेले आहे.
शेअर करा
Exit mobile version