केज दि.२९ – आज पुन्हा एकदा केज तालुक्यामध्ये अवकाळी ने आपला रंग दाखवला. सायंकाळी पाचच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली आणि केज तालुक्यातील बहुतांश भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. पाऊसही मोठ्या प्रमाणावर झाला असून जमिनीवर पाणी साठल्याचे चित्र दिसत आहे.
केज तालुक्यातील तांबवा या गावी आणि परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर वादळ वाऱ्यासह गारपीट झाली असून फळबागांना पुन्हा एकदा मोठा फटका बसला आहे. मागच्या पंधरा दिवसापासून सुरू असलेले हे अस्मानी संकट आज पुन्हा घोंगावले असून अगदी थोड्याच वेळात सर्वत्र पाणीच पाणी झाले. विजांचाही कडकडाट सुरू असल्याने नागरिक भयभीत झाल्याचे दिसून आले.