केज दि.३० – रविवारी पहाटे 3 ते 4 वाजेच्या दरम्यान तालुक्यातील नांदूर घाट येथील चार दुकानांचे शटर्स तोडून चोरीचा प्रकार घडला. या सर्व प्रकारामुळे परिसरातील व्यापारी व नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.
रफिक तांबोळी, अच्युत बिक्कड, रावसाहेब् मुळे, दत्ता कळमकर
या चार व्यापाऱ्यांचे दुकानाचे शटर वाकवून चोरी केली अन चोरट्यांनी पोबारा केला. यात एक मेडिकल, किराणा दुकान, बांधकाम साहित्याचे दुकानाचा समावेश आहे.
दरम्यान, रविवारी दुपारी उशिरापर्यंत पंचनामा ची प्रक्रिया चालू होती. नांदूर घाट पोलीस चौकीचे अंमलदार श्री.भालेराव हे पुढील तपास करत आहेत.