Site icon सक्रिय न्यूज

केजमध्ये पुन्हा दोन

केज दि.२ – जिल्ह्यात आज कोरोना बाधितांचा मोठा आकडा समोर आला असून आज एकूण 83 रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये परळी 36 बीड 20 गेवराई 7 अंबाजोगाई 8 पाटोदा 4 धारूर 2 माजलगाव 2 केज 2 वडवणी 1 तर शिरूर मध्ये एक रुग्ण आढळून आला आहे. अनिर्णित 6 तर 6 नाकारले आहेत. दरम्यान रुग्ण दिवसेंदिवस वाढत असले तरी बहुतांश नागरिकांना याचे गांभीर्य दिसत नसून विना मास्क फिरणारे तसेच सोशेल डिस्टनसिंग धाब्यावर बसवणारे लोक केज शहरात बिनधास्त वावरताना दिसत आहेत. बाजार असो वा मेन रोड सर्वत्र गर्दीचं गर्दी दिसून येत आहे. तालुका प्रशासनाच्या वतीने संबंधित लोकांवर दंडात्मक कारवाई करण्याची गरज निर्माण झाली असून त्याशिवाय बेशिस्त लोक ठिकाण्यावर येणार नाहीत.
शेअर करा
Exit mobile version