केज दि.२ – अचानक आणि कुणाच्याही ध्यानीमनी नसताना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपल्या पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. आणि त्यानंतर प्रचंड मोठ्या प्रमाणावर गदारोळ उठला. अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. सर्व प्रमुख नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी शरद पवार यांना गराडा घातला आणि साहेब आपण निर्णय मागे घ्या, आपण आहात तर राष्ट्रवादी आहे त्यामुळे निर्णया आपण मागे घ्यायलाच पाहिजे असा आग्रह सुरू आहे. मात्र अद्याप पर्यंत तरी शरद पवार यांनी आपले मौन सोडले नसून राष्ट्रीय कार्यकारिणी अध्यक्ष पदाबाबत निर्णय घेईल, मी राष्ट्रवादी पासून दूर जाणार नाही मी राष्ट्रवादीच्या सर्व कार्यक्रमाला सोबत असेल मात्र मी फक्त पदाचा त्याग करत आहे एवढे एवढेच वक्तव्य त्यांनी करून आपले मौन कायम ठेवले आहे.
दरम्यान, शरद पवार यांच्या निर्णयाला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची संमती असल्याने राष्ट्रवादी मध्ये दोन गट पडले आहेत.मात्र तडकाफडकी निर्णयाने घेतल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.