Site icon सक्रिय न्यूज

नगरपंचायत च्या वतीने उमरी रस्त्याचे उद्घाटन…..!

केज दि.२ – मागच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या केज शहरातील उमरी रस्त्याचे उद्घाटन अखेर नगरपंचायत च्या वतीने करण्यात आले.                                 केज शहरातील प्रभाग पाच आणि सहा व इतरही उर्वरित प्रभागाला जोडणारा उमरी रस्ता हा मागच्या काही वर्षापासून अतिशय दुर्लक्षित होता. मोठ्या प्रमाणावर वर्दळ असलेल्या या रस्त्यावर वाहने तर सोडाच  परंतु पायी चालणे सुद्धा मुश्किल झालेले होते. मागच्या अनेक वर्षांपासून सदरील रस्ता करण्यात यावा यासाठी केज विकास संघर्ष समितीच्या वतीने सातत्याने आंदोलने करण्यात आली. मात्र कित्येक वर्षापासून प्रश्न हा प्रलंबित होता. परंतु मंगळवारी केज नगरपंचायत चे नगराध्यक्ष सीता बनसोड तसेच हारून इनामदार, मुख्याधिकारी महेश गायकवाड, हनुमंत भोसले व कांही नगरसेवकांच्या उपस्थितीमध्ये सदरील रस्त्याचे उद्घाटन करण्यात आले.

                                                     सदरील रस्त्याचे प्रत्यक्ष काम हे येत्या दोन ते तीन दिवसात सुरू करण्यात येईल असे यावेळी नगरपंचायत प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे. सदरील रस्त्याचे काम दोन टप्प्यात होणार असून पहिल्या टप्पा हा नगरपंचायतला आलेल्या 98 लाख रुपयांच्या निधीमधून होईल तर उर्वरित जो रस्ता आहे तो आमदार नमिता मुंदडा यांच्या आमदार फंडातून होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
शेअर करा
Exit mobile version