केज दि. २ – तारावर आलेले फाटे तोडण्यासाठी गेलेल्या एका इसमाचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
शहरातील क्रांतीनगर भागामध्ये रहात असलेल्या उत्तम अंबाजी जाधव (48) यांच्या घराच्या जवळून विद्युत तारा जातात. विद्युत तारेवर झाडाच्या फांद्या आल्यामुळे ते मंगळवारी (दि.२मे) दुपारी चार वाजता तोडण्यासाठी गेले असता त्यांना शॉक लागला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.ते माजी नगरसेवक लक्ष्मण जाधव यांचे चुलते होते.