Site icon सक्रिय न्यूज

बीड तालुक्यातील नाळवंडी येथे धक्कादायक घटना आली समोर….!

बीड दि.४ – तालुक्यातील नाळवंडी येथील बाबासाहेब रावसाहेब म्हेत्रे व कुशीवर्ता बाबासाहेब म्हेत्रे रा.नाळवंडी ता.जि.बीड पती-पत्नीचे मृतदेह आढळून आल्याची झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

                तालुक्यातील पिंपळनेर पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या नाळवंडी येथील हे शेतकरी पती-पत्नी आहेत. दोघांचा संशयास्पद मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. राहत्या घरी एका खोलीत पत्नी मृत अवस्थेत आढळली तर दुसऱ्या खोलीमध्ये पतीचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला आहे..

                  सदरील घटना (दि.३) एप्रिल रोजी मध्यरात्री घडली असल्याची प्राथमिक माहिती आहे. पती-पत्नीचा मृत्यू कोणत्या कारणाने झाला हे अद्याप समजू शकलेलं नाही. 

                दरम्यान घटनेची माहिती मिळताच पिंपळनेर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक कैलास भारती यांनी घटनास्थळाला भेट दिली असून याप्रकरणी तपास केला जात आहे. पुढील काही तासांत हे प्रकरण नेमकं काय आहे याची सत्यता समोर येईल.

शेअर करा
Exit mobile version