Site icon सक्रिय न्यूज

सैनिकी स्कूल प्रवेश पात्र विद्यार्थ्यांचा ग्रामशक्ती वेल्फेअर फाउंडेशन च्या वतीने सत्कार…..!

अंबाजोगाई दि.१६ – ऑल इंडिया सैनिकी स्कूल (All india military school) प्रवेश परीक्षा सन 2023 उत्तीर्ण होऊन डॉ. पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सैनिकी स्कूल लोणी प्रवरानगर pravaranagar येथे प्रवेश मिळाल्याबद्दल आयुष अमोल काकडे व रुद्रप्रताप भागवत जाधव या विद्यार्थ्यांचा सत्कार ग्रामशक्ती वेल्फेअर फाउंडेशन (welfare foundation) अंबाजोगाई च्या वतीने नुकताच करण्यात आला.
            आयुष काकडे यांने जूनियर आयएएस (junior ias) परीक्षेमध्ये राज्यातून तृतीय येण्याचा मानही मिळवला. तसेच सदरील विद्यार्थी स्कॉलरशिप पात्र झाले आहेत. यावेळी मराठवाडा (marathwada) शिक्षक संघाचे धाराशिव जिल्हा सचिव व्ही.एस.मयाचारी ग्रामशक्ती वेल्फेअर फाउंडेशन अंबाजोगाईचे अध्यक्ष ज्योतीराम सोनके, उपाध्यक्ष प्रा.भागवत गोरे, बालासाहेब खोगरे, प्रा.अशोक नखाते, नितीन गोबाले, अमोल काकडे, भागवत जाधव आदींसह पालक उपस्थित होते.
शेअर करा
Exit mobile version