Site icon सक्रिय न्यूज

आज पुन्हा केज अंबाजोगाई रोडवर अपघात….!

आज पुन्हा केज अंबाजोगाई रोडवर अपघात….!

केज दि.१७ – केज – अंबाजोगाई रोडवरील ढाकेफळ नजीक अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला तर एक जखमी आहे.

         तालुक्यातील सावळेश्वर पैठण येथील प्रशांत अनुरथ सरवदे व अमोल सरवदे हे मोटारसायकल वरून गावाकडे जात असताना अंबाजोगाई कडून येणाऱ्या अज्ञात वाहनाने धडक दिली. यात प्रशांत अनुरथ सरवदे हा जागीच ठार झाला तर अमोल सरवदे जखमी आहे.
           दरम्यान, काल दि.१६ रोजी त्याच रोडवर ढाके फळ येथील महादेव पांचाळ यांना कारने धडक दिल्याने जीव गमवावा लागला आहे.आज दुसऱ्याच दिवशी पुन्हा एका तरुणाचा अपघाती मृत्यू झाल्याने अपघाताचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे.
शेअर करा
Exit mobile version